कवीदादा
------------
श्रीराम पचिंद्रे यांच्या फुलोरा या पहिल्या काव्यस्रग्रहाच्या प्रकाशन समारंभात त्यांचा सत्कार करताना कवी सुधांशु. छायाचित्रात डावीकडे बसलेले अंबादास माडगूळकर आणि प्रा. भैरव कुंभार, रा. वा. शेवडे गुरुजी.
दि. 5 सप्टेंबर 1982
छायाचित्र -गुलाब मणेर
---------------------------------------------------------------------------------------------------------
कवीदादांशी अधूनमधून पत्रव्यवहार सुरू होता. एके दिवशी अचानक ‘महत्त्वाचे कामआहे, जमल्यास औदुंबरला येऊन जा’ असं दादांचं पोस्टकार्ड आलं. मी गेलो. दादांनी त्यांच्या काव्यसंग्रहाचं हस्तलिखित माझ्यासमोर ठेवलं आणि पुनर्लेखन करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांचे हात थरथरत होते. तसं माझं हस्ताक्षर काही सुंदर मानलं जात नाही, पण दादांना ते निदान चांगलं आहे असं वाटलं. दोन बैठकांमध्ये मी त्यांच्या ‘यात्री’ संग्रहाचं पुनर्लेखन मी पूर्ण करून दिलं. मी नको नको म्हणत असताना त्यांनी प्रवास खर्चाचे पैसे माझ्या खिशात बळजबरीनं कोंबले.त्या संग्रहात माझा नामोल्लेख दादांनी मोठ्या आस्थेनं केला.
--------------------
1978 चा जानेवारी महिना. मी अकरावीत प्रवेश घेतला होता. एके दिवशी वृत्तपत्रात बातमी आलेली दिसली. सांगली जिल्ह्यात औदुंबर नावाच्या गावी ‘सदानंद साहित्य संमेलन’ भरणार आहे. गेली अनेक वर्षे ते संमेलन भरत असत.
त्या आधी कुठल्याच मोठ्या कवी संमेलनात भाग घेतला नव्हता. आमच्या वडिलांना मी औदुंबरच्या संमेलनाला जायची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यांनी परवानगी आणि पैसे दिले. मग 14 जानेवारीदिवशी मी लाल रंगाच्या रा. प. मार्ग परिवहन मंडळास बसनं गेलो. आई होती माझ्यासोबत. बसमध्ये सारे कवीच भरले होते. औदुंबरला पहिल्यांदाच गेलो होतो. मी आणि आईनं दत्ताचं दर्शन घेतलं. मग संमेलनस्थळी गेलो. एक भलं मोठ्ठं वडाचं झाड होतं. बाजूला साधं व्यासपीठ, त्यावर मान्यवर कवी, लेखक आणि जमिनीवर अंथरलेल्या मोठ्या जाजमांवर श्रोते आणि इतर कवीसुद्धा बसलेले. जाऊन नाव नोंदवलं.
नाव पुकारल्यावर जाऊन कविता सादर केली. पहिल्यांदा भ्यालो, पण नंतर भीती गेली. कविता भारतीय संस्कृतीविषयी होती. वाचन संपल्यावर थोड्या टाळ्या पडल्या. बरं वाटलं मी गेल्या व्यासपीठांवरील खुर्च्यांवर बसलेले मान्यवर कोण कोण आहेत हे पाहिलं. त्यात प्रथमदर्शनीच एक व्यक्ती मनात ठसली. शुभ्र गांधी टोपी, शुभ्र सदरा आणि धोतर. नाक तरतरीत, चेहरा गंभीर पण उत्सुक. नंतर समजलं, हेच ते कवी सुधांशु, याच संसमेलनात एका उत्साही प्राध्यापकांचा परिचय झाला. वैजनाथ महाजन! कवी सुधांशु आणि महाजन सर या दोघांशी झालेला परिचय पुढं अतिशय दृढ झाला. सुधांशू यांना सारेच कवीदादा म्हणायचे, कवीदादांचा माझ्यावर अखेरपर्यंत लोभ राहिला.
दादा दत्तभक्त होते. त्यांनी लिहिलेली.
‘दत्त दिगंबर दैवत माझे
हृहयी माझ्या नित्य विराजे’
यासारखी अनेक भक्तीगीते त्यांना अंतःकरणाच्या तळापासून स्फुरलेली होती.
त्यांचा काव्याचा झरा समोरून वाहणार्या निर्मळ कृष्णा नदीसारखाच निर्मळ आणि नैसर्गिक होता.
‘दत्त दिगंबरा’ हे गीत असो की,
‘देव माझा विठू सावळा
त्याची माझीया गळा’
हे भावमधूर गीत असो. कवीदादांना पाहण्यापूर्वी अनेकदा आमच्या घरच्या सर्वांनी ती ऐकली होती. मनापासून आवडत होती. ती लिहिण्यार्या कवीला समक्ष पाहणं हा माझ्या कोवळ्या वयातला एक थरारच होता.
नंतरच्या काळात पं. वसंत अगजगावकर यांनी गायलेलं कवीदादाचं नितांत सुंदर भावगीत आकाशवाणीवरून कानी पडलं.
भुलविलेस साजणी तू विलोल लोचणी,
फुलविलेस मन्मनी स्वप्न एक कांचनी...
वा! विलक्षण सुंदर. इतकं सुंदर हळवं प्रेमगीत नंतर क्वचित कानी पडलं असेल.
हे गीत एका नवथर प्रेमिकाचं नाही. तर पत्नीवर जिवापाड प्रेम करणार्या एका पतीचं आहे. पत्नीच्या सेवाभावी स्वभावानं दिपून. भारावून गेलेला पती तिला उद्देशून आपल्या भावना व्यक्त करत आहे.
तू न रूपगर्विता
तू न धुंद चारूता
सांज सावळीच तू सांडीलीस मोहिनी...
तू न गायिका कुणी
गायिलीस रागिणी
बोल लाजरे तुझे गीत फुलविती मनी...
तु सुशील साधिका
स्नेहशील दीपिका
प्रेमभाव उधळुनी जाहली स्वामिनी...
असं तीन कडव्याचं भावगीत आहे. पण तेवढ्यात पती-पत्नीच्या प्रेमाचं महाकाव्य बहरलेलं आहे.
कवीदादांच्या एकूणच सगळ्या काव्यात एक उत्कटता आणि प्रासादिक माधुर्य आहे. रसिकाला आपलंसं करणारा जिव्हाळा आहे.
त्या साहित्य संमेलनानंतर मी आणखी काही वेळा गेलो. नंतर मला कवीदादांनी स्वतः लिहिलेल्या माझ्या नाव पत्त्यानं निमंत्रण पत्रिका दरवर्षी येत राहिली. संक्रांती दिवशीच हे संमेलन भरतं. कवीदादा गेल्यानंतरही ते तिकक्याच उत्साहानं त्याच दिवशी भरत आलेलं आहे. इतर छोट्या संमेलनाप्रमाणंच एक कवीसंमेलन असतं. किंबहुना कवीसंमेलनालच जास्त महत्त्व असतं. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जसा मान्यवर असतो, तसा कवीसंमेलनाचाही महत्त्वाचा असतो.
औदुंबरच्या पलिकडे भुवनेश्वरवाडी हे गाव आहे. नदीतून नावेतून पलीकडे जावं लागतं. पैलतीरावर भुवनेश्वरी देवीचं काळ्या पाषाणातील हेमाडपंथी मंदिर ाअहे.
थोर ग्रामीण कथाकार म. भा. भोसले हे कवीदादांचे मित्र याच गावचे. मराठी समीक्षेनं त्यांच्याएवढी उपेक्षा क्वचित कोणाची केली असेल.
एका वर्षी मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट हे दोन दिग्गज एकाच वेळी आले होते. ते दोघेही कवीदादांच्या स्नेहातले होते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे औदुंबरचेच. संमेलनाच्या आयोजनात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. तेही होते. त्यादिवशी दुपारी सहभोजन झाल्यावर पाडगावकर, बापट आणि कवीदादा यांच्यासह नावेतून भुवनेश्वरवाडीला गेलो. नावेतून येता-जाता तिघांच्या कविता ऐकण्याचा आनंद लाभला. रात्री बापटांनी लावण्यात रंग भरला. पण चावट लावण्या ऐकताना संकोचून गेलेला कवीदादांचा सात्विक चेहरा माझ्या अजून डोळ्यासमोर आहे. मराठीतले बहुतेक सगळे मान्यवर लेखक-कवी औदुंबरच्या सदानंद साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले. कवीदादांचा लोभच तसा होता. सुरुवातीपासून कित्येक वर्ष असं घडत गेलं होतं की, जो लेखक औदुंबर संमेलनाचा अध्यक्ष होई, तो नंतर लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचा. कसं कुणास ठाऊक, पण हे घडलं खरं!
या बर्याच कविता लिहून झाल्या. कुणीतरी मला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेसाठी माझा काव्यसंग्रह पाठवावा, असं सुचवलं. मी कविता संग्रहित केल्या. म. रा. सा. सं. मंडळाकडे हस्तलिखित किंवा टंकलिखित पाठवताना त्याला मान्यवर लेखक-कवि-समीक्षकाची प्रस्तावना किंवा शिफारस हवी अशी अट होती. आधी दूरध्वनी करण्याची सुविधाच नव्हती. भ्रमणध्वनीचे तर नावच नव्हतं. पत्रही न पाठवता मी थेट औदुंबरला कवीदादांकडे गेलो. पण त्यांना माझ्या कविता पसंत पडल्या नाहीत. एखाद-दुसरी कविता आवडली, पण एवढ्यातच संग्रह काढू नये असं ते म्हणाले. मी निराश होऊन परतलो. पण त्यामुळं कवीदादांवर नाराज मात्र झालो नाही.
दीपक भागवत हा माझा ज्येष्ठ मित्र होता. त्याच्या बरोबर मी नानांकडे गेलो. नाना म्हणजे प्रख्यात चित्रपटकवी जगदीश खेबूडकर. आम्ही नानांच्या मंगळवार पेठेतल्या नूतन मराठी विद्यालयासमोर असलेल्या घरात गेलो. दीपकची त्यांच्याशी बरीच जवळीक असलेली दिसली. त्यांनी प्रस्तावना द्यायचं मान्य केलं. हस्तलिखिताची प्रतिलिपी मी त्यांच्या हाती सोपवली, तो मार्च महिना होता. साहित्य संस्कृती मंडळाकडे हस्तलिखित पाठवण्याचा शेवटचा दिवस होता. 31 मे मी नानांच्या घरी सात-आठ हेलपाटे घातले. पण त्यांनी माझ्या कविता वाचल्याही नव्हत्या. मेच्या शेवटच्या आठवड्यात मी त्यांच्याकडे पुन्हा गेलो. तेव्हा, ‘अरे, आता आणखी चार महिने तरी मला सवड नाही, मी तुला ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावना देतो. कधीपर्यंत पाठवायचं आहे अनुदानासाठी?’ मी म्हटलं, ‘नाना, 31 मे हा शेवटचा दिवस आहे.’
‘असं होय? मग पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात पाठव. जगदीश खेबूडकरची प्रस्तावना मिळणार असेल तर एक वर्ष थांबलास तरी काही बिघडत नाही’.
आपल्या नावावर जोर देत नाना म्हणाले, मी खट्टू झालो, पण त्यांच्याकडे असलेली प्रत परत मागायचा धीर मला झाला नाही.
त्यावेळी कविवर्य नारायण सुर्वे हे मंडळाचे अध्यक्ष होते. समीक्षक डॉ. एस. एस. भोसले हे त्यांचे स्नेही होते. आमच्या नाईट कॉलेजचे प्रा. भैरव कुंभार यांच्या ओळखीने मी त्यांच्याकडे गेलो. भोसले सरांनी नारायण सुर्वे यांच्या नावाने पत्र लिहून दिले. एकदा महाविद्यालयात माडगूळकरांची धाकटी पाती डॉ. अंबादास माडगूळकर हे आले होते तेव्हा त्यांची ओळख झाली होती. कुंभार सरांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडेही मी प्रत दिली होती. त्यांनी सुंदर अभिप्राय लिहून दिला. तो माझ्या त्या ‘फुलोरा’ काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर छापलेला आहे.
झालं संग्रह मंडळाकडे पाठवला. 1800 (एक हजार आठशे) रूपयाचं अनुदान मंजूर झालं. एक दोन अडथळे येऊन अनुदानाचा धनादेश प्रकाशक रा. वा. शेवडे गुरुजी (प्रसिद्ध बालवाडमयकार व भाऊसाहेब खांडेकरांचे लेखनिक) यांना मिळाला. वरचे सहाशे रुपये घालून त्यांनी संग्रह एकदाचा छापला.
काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कुंभार सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित केला. सरांनी कवी सुधांशू यांना बोलावलं. ते आंनदानं आले. कोल्हापूरला स्वतःच्या खर्चानं आले आणि गेले. चांगलं बोलले. अंबादास माडगूळकरही आले. अप्रतिम बोलले.
कवीदादांशी अधूनमधून पत्रव्यवहार सुरू होता. एके दिवशी अचानक, ‘महत्त्वाचे काम आहे. जमल्यास औदुंबरला येऊन जा’ असं दादांचं पोस्टकार्ड आलं. मी गेलो. दादांनी त्यांच्या काव्यसंग्रहाचं हस्तलिखित माझ्यासमोर ठेवलं आणि पुनर्लेखन करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांचे हात थरथरत होते. तसं माझं हस्ताक्षर काही सुंदर मानलं जात नाही. पण दादांना ते निदान चांगलं आहे असं वाटलं. दोन बैठकांमध्ये मी त्यांच्या ‘यात्री’ संग्रहाचं पुनर्लेखन मी पूर्ण करून दिलं.मी नको नको म्हणत असताना त्यांनी प्रवास खर्चाचे पैसे माझ्या खिशात बळजबरीनं कोंबले.ेत्या संग्रहात माझा नामोल्लेख दादांनी मोठ्या आस्थेनं केला.
ते हयात असेपर्यंत औदुंबरच्या कवी संमेलनाचा अध्यक्ष होण्याची माझी इच्छा होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर सन 2008 मध्ये तो योग आला. ज्या संमेलनात मी नवोदित कवी म्हणून प्रवेश केला. तिथला अध्यक्ष झालो. पण ते बघायला कवीदादा नव्हते.
‘रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्नान
भुकेला भक्तीला भगवान’
असं सहजपणे लिहून गेलेले एक शांत, सात्विक, स्वच्छ, पूर्णपणे निर्व्यसनी, भाविक, दत्तभक्त, नवोदितांना निरलसपणे मार्गदर्शन करणारे असे हे दुर्मिळ व्यक्तिमत्वाचे श्रेष्ठ मराठी कवी औदुंबरात होऊन गेले. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी होऊन गेली.
- श्रीराम ग. पचिंद्रे
कार्यकारी संपादक,
दैनिक, पुढारी,
कोल्हापूर