श्री
काश्मीरची साद- 3
श्रीराम ग. पचिंद्रे
--------------
...म्हणून हातात बंदुका आल्या!
आपल्या गावचा माणूस जगाच्या पाठीवर कुठंही भेटला, तर कुणालाही आनंद होतो; तसाच मला झाला, श्रीधर पाटील यांना भेटल्यावर. श्रीधर पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातल्या तुरुकवाडीचे. सध्या ते कुलगाम ह्या दहशतवादी मानल्या गेलेल्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आहेत. कुल शब्दाचा अर्थ झरा. अनेक छोट्या छोट्या झर्यांचा जिल्हा म्हणजे कुलगाम. 2010 मध्ये भारतीय पोलिस सेवा उत्तीर्ण झाले आणि 2011 पासून काश्मिर खोर्यात आहेत. बुरहान वणीला मारलं, तेव्हा ते अवंतीपूरचे जिल्हा पोलिस प्रमुख होते. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी सारे अधिकारी जमायचे होते. त्यांना जायचं होतं. आमच्यासाठी ते अनंतनाग पोलिस मुख्यालयात आले होते.
पाटलांच्या म्हणण्यानुसार अनंतनाग, कुलगाम हा सगळा जंगलाचा भाग आहे. शहरापासून दूर आहे. ऑर्किड्स, अक्रोड, सफरचंदाचे मळे पिकवणारे जमीनदार कुलगामात आहेत. वर्षाकाठी एकेका घरात 25- 30 लाख रुपये येतात. पण सगळ्या जिल्ह्यात मिळून महाविद्यालय मात्र एकच आहे. ह्या परिसरात हिंसाचाराला सामाजिक पाठिंबा आहे. तरुणांना हिंसाचार करणं म्हणजे हिरॉईक वाटतं. 20 ते 25 वयोगटातील तरुणांना आपली ऊर्जा बाहेर काढायला काहीच प्रेरणा नाही. आपल्याकडे कसं तरुणांसमोर क्रिकेटवीर, चित्रपटातले तारे, आयएएस - आयपीएस अधिकारी अशी प्रेरणास्थानं असतात. तशी दहशतवादी ही इथली प्रेरणास्थानं आहेत. दंगलींचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. दहशतवादी तरुण पोलिस प्रमुखालाच सांगतो की, काश्मीर स्वतंत्र झालेलाच आहे, तुम्हांला माहीत नाही, दिल्लीत बोलणी चालू आहेत. मसुद्यावर शेवटचा हात फिरवायचं काम चाललंय. इथल्या दहशतवादाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. परवा मारला गेलेला दहशतवादी शाहजार अमली पदार्थांच्या व्यवहारातला होता. बुरहान प्रकरण वेगळं, तो तर हिजबुलचाच होता. दहशतवादी काम करा, शहीद व्हा, तुमच्या अंत्ययात्रेला दहा हजार लोक जमतील, तुम्ही हीरो व्हाल, असं तरुणांवर बिंबवलं जातं. इथली कायद्याची चौकट एवढी ढिली झालेली आहे की, खुनी आणि स्मगलरसुद्धा 15 दिवसात जामीनावर सुटून समाजात येतो. भ्रष्टाचार खूप आहे. विकासकामं होत नाहीत. मूलभूत सुविधाही लोकांना मिळत नाहीत.
श्रीधर पाटील यांचा निरोप घेऊन पहलगामच्या दिशेनं चाललो. वाटेत लागणार्या अवंतीपुरातील त्राल गावात क्रिकेटच्या बॅटी तयार करण्याचे कारखाने या परिसरात आहेत. बुरहान वणी त्राल गावचा रहिवासी होता. ङ्गसरहदफ संस्थेनं या भागातील तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र केलं होतं. तरुणांनी दहशतवादाकडे वळू नये म्हणून विधायक मार्गाकडे नेण्याचा हा प्रयत्न होता. श्रीधर पाटील यांनीही पुढाकार घेतला होता. मुनीर हा तरुण उत्तम क्रिकेट खेळायचा. त्याच्या नेतृत्वाखाली चांगला संघ तयार झाला होता. पण असे उपाय दीर्घकालीन असतात. त्याला सातत्य लागतं. दुर्दैवानं त्यात सातत्य ठेवता आलं नाही, त्यामुळं तिथून मुनीरसारखा क्रिकेटवीर बाहेर न पडता, बुरहानसारखे दहशतवादी निर्माण झाले, प्रेरणा चुकीच्या असल्यामुळं हातात बंदुका आल्या, दगड आले.
पहलगाम हे काश्मिरातलं सर्वांगसुंदर गाव. काश्मिरी लोकांचं स्वास्थ्य विघडायला महाभारत काळापासून आरंभ झाला. श्रीकृष्ण फिरत फिरत काश्मीरपर्यंत गेला होता. गोनंद नावाचा राजा त्यावेळी काश्मिरात होता. त्याची राणी यशोमती. गोनंदानं श्रीकृष्णावर हल्ला केला. हा यादव घराण्यावरचा हल्ला असल्यानं बलरामानं गोनंदाला मारलं, अशी कहाणी नीलमत पुराणात सांगितलेली आहे. राजतरंगिणी हा कल्हणानं लिहिलेला काश्मिरचा काव्यात्म राजकीय इतिहास आहे, तर नीलमत पुराण हा काश्मिरचा सांस्कृतिक इतिहास आहे. ब्रिटिशांनी दहा वर्षं काम करून ह्या ग्रंथांचा तौलनिक अभ्यास केला. आपल्याकडे मात्र त्यावर काम झालं नाही.
पहलगामचा रस्ता विलक्षण सुंदर आहे. दुतर्फा अक्रोड- सफरचंदाची झाडं आहेत. सध्याच्या दिवसातील सफरचंदाची भाजी चांगली होते म्हणे.
पहलगाममधल्या पर्यटनाशी संबंधित संघटनांच्या पदाधिकार्यांनी चर्चा आयोजित केली होती. त्यात घोडेवाल्यांची संघटनाही होती.
1996मध्ये महापूर आला होता. त्यात 50 हजार अमरनाथ यात्रिक अडकले होते. त्यांना पहलगामच्या रहिवाशांनी आपल्या घरात पैसे न घेता आसरा दिला होता. ते यात्रेत मोफत आरोग्य शिबिर चालवतात. ते स्वतःला धार्मिक समजतात, धर्मवादी नव्हे! बेरोजगारीचं प्रमाण एवढं आहे की पदव्युत्तर तरुण
पर्यटकांना घोड्यावरून ने- आण करण्याचं काम करतात. चाळीस टक्के पदव्युत्तर पदवीधर, चाळीस टक्के पदवीधर, दहा टक्के दहावी शिकलेले, पाच टक्के दहावीपेक्षा कमी आणि पाच टक्के अजिबात न शिकलेले तरुण घोड्यांच्या व्यवसायावर आपली गुजराण करतात. पहलगाम संपूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे.
पर्यटकांना आणि लष्कराच्या जवानांना अपघात झाला, ते रक्तबंबाळ झाले, तर त्यांना माणुसकीच्या नात्यानं रहिवाशांनी रक्तदान करून वाचवल्याची उदाहरणं आहेत.
त्यातील काही (मुसलमान) व्यावसायिकांचं म्हणणं असं, ङ्ग हम शिवजी के चरणों में रहते है. हम अमरनाथ यात्रिओंको कंधे पर उठाकर ले जाते हैं, उनको मदद करते हैं. उनका रक्षण करते हैं. शिवजी हमें आशीर्वादही देते है. इसलिए तकफीफ बहोत होती है फिर भी हम हिंमत नहीं हारते, खुदकुशी नहीं करते...हमें रियासतमे मजबूत रहना है. फ
गुलमर्ग, सोनमर्गमधल्या काही ठराविक लोकांकडे सफरचंद, अक्रोडाच्या बागा आहेत. तेवढेच श्रीमंत आहेत. उरलेल्या गरीब लोकांच्याजवळ भाताचीही शेती नाही. आम्ही म्हणजे दगड फेकणारे अशीच प्रतिमा निर्माण केलेली आहे. गोव्यातला एक तरुण इथं कामाला होता. तो सुट्टीवर गेला होता, त्याचे पालक त्याला मह्णाले की, जाऊ नको परत काश्मीरला. नाहीतर तूही दगड फेकणारा होशील. अशी आमची बाहेरच्या जगात प्रतिमा! विकासाची कामं होत नाहीत, रोजगार नाही. एक वर्षं आमची एक पैसा मिळकत नाही. आम्ही जगायचं कसं? प्रसारमाध्यमं नकारात्मक गोष्टी जास्त दाखवतात. टी. व्ही. वाल्यांनी आपलं काश्मीरबद्दलचं प्रसारण बंदच केलं तर बरं होईल. पर्यटक येतील आणि आमचे निम्म्याहून अधिक प्रश्न सुटतील, त्यांनी काहीच दाखवू नये, असं पहलगामवासीयांचं म्हणणं आहे.
पहलगाममधल्या हिंदु- मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मामलेश्वर शिवमंदिर दाखवलं जातं. हे मंदिर 5 व्या शतकात राजा जयसिंहानं बांधलं. मामलेश्राचा पुजारी मुसलमान आहे. गुलाम हसन हे त्याचं नाव. तो मंदिराची देखवाल आणि पूजाअर्चा करतो. अत्यंत स्वच्छ, नितळ पाण्यानं भरून वाहणार्या लिड्डर नदीच्या उजव्या तीरावर हे लहानसं मंदिर आहे. समोर कुंड आहे, त्यात नदीचं पाणी येतं. ते अर्थातच अतिशय शुद्ध आणि शीतल आहे. सर्वत्र पाईन आणि चिनारची झाडे आहेत. अक्रोड आणि बदामपेक्षाही पाईन वृक्षाचे दाणे चवदार असतात आणि तीन हजार रुपये किलोनं ते विकले जातात अशी माहिती मिळाली. काश्मिरात आम्हांला कुठंच म्हशी दिसल्या नाहीत, फक्त गाई आणि बकरी. भिकारी दिले नाहीत. फक्त एक भिकारीण दिसली, ती मट्टंड मधल्या प्राचीन सूर्यमंदिराच्या बाहेर. श्रीनगर- पहलगामच्या रस्त्यावरच आतल्या बाजूला वळणावळणाचा चढतीचा रस्ता आहे. तो चढून गेल्यावर प्राचीन सूर्य मंदिर आहे. त्याच्या अलीकडं त्याच्या मानानं आधुनिक काळातलं सूर्यमंदिर आहे. तिथं सूर्याची रथात बसलेली मूर्ती आहे. विशाल कुंड समोर आहे. त्यात लक्षावधी मासे आहेत. त्या माशांना तिथं संरक्षित केलेलं आहे. माशांना खायला घालायची भाविकांना मुभा आहे. ते खाद्य तिथं विकत मिळतं. मूळ सूर्य मंदिराकडे आम्ही गेलो. एका विशाल मंदिराची ती भग्नावस्था पाहून मन विषण्ण झालं. अनंतनाग जिल्ह्यातलं हे मंदिर मट्टंड गावात आहे. मंदिराचं नाव सूर्य मार्तंड मंदिर आहे. मार्तंड नावाचा अपभ्रंश होऊन त्याचं मट्टंड झालं. सन 370 मध्ये मार्तंड सूर्यमंदिराचा पाया घातला गेला. पण पुढे दीर्घकाळ मंदिराचं काम रेंगाळलं असावं. कारण त्यानंतर अनेक वर्षांनी कर्कोटक राजघराण्याचा तिसरा अधिपती ललितादित्य मुक्तापीड यानं सन 721 ते
761 ह्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण केलं. काश्मिरच्या समृद्ध वास्तुवैभवातला शिरपेच म्हणजे हे अद्वितीय सूर्यमंदिर होय. आज मंदिराचे अवशेष पाहिले, तरी एके काळच्या त्याच्या भव्यतेची, वैभवाची आणि सौदर्याची कल्पना येते. मंदिराचा आकार 222 फूट लांब आणि 142 फूट रुंद आहे. त्याच्या बाहेरचा प्राकार त्याहून भव्य आहे. त्याच्या काळ्या पाषाणातील भक्कम भिंती पाहून मंडप किती भव्य असेल याचा अंदाज येतो. अनेक भक्कम खांबांनी हे मंदिर तेव्हा तोलून धरलेलं होतं. भिंतींवर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. ललितादित्यानं गांधार, गुप्त, चिनी, रोमन सीरियन, ग्रीक अशा विविध स्थापत्यशैलींचा अभ्यास करून मंदिराची उभारणी केली होती. मंदिराच्या गाभार्यात सूर्यदेवाची मूर्ती होती. आता तिथं काहीच नाही. ह्या अत्यंत सुंदर आणि भव्य मंदिराचा विनाश 15 व्या शतकाच्या आरंभी मुस्लिम राजा सिकंदर बुतशिकन यानं केला. हे मंदिर पुरतं उद्ध्वस्त करीपर्यंत त्याला समाधान लाभलं नाही. आजही त्या मंदिराचे भग्नावशेष त्याच्या विशाल सौंदर्याची साक्ष देतात, हे खरं!
(क्रमशः)

No comments:
Post a Comment