श्री
कश्मीर, कश्मीरीयत, कश्मीरी
अनंतनाग जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांगला देशात वैद्यकीय शिक्षण घ्या अशा मोठमोठ्या जाहिरातींचे अनेक फलक दिसले. एके
ठिकाणी स्वतंत्र काश्मीरची मागणी करणार्या एका नेत्याचे अभिनंदन करणारा फलक मोक्याच्या जागी लावलेला दिसला. तो काढण्याचा कुणी प्रयत्न केलेला दिसत नव्हता. आम्ही पहलगाममध्ये होतो तेव्हा अवंतीपुर्याजवळ चकमक झाली, दोन दहशतवादी आणि एक नागरिक ठार झाला. महामार्गावरील सगळे व्यवहार दहशतवाद्यांनी बंद केले.
श्रीनगरच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचे उपाध्यक्ष मोहम्मद सरताज मदनी यांची भेट झाली. मुख्यमंत्री मेहबूबा यांचे ते मामा. जे हिंदुस्थानवर नाराज आहेत, त्यांच्याशी बोला. लढाई, भांडण, दगडफेकीनं काही होणार नाही. पाकिस्ताननं सामना जिंकल्यावर जल्लोष का होतो? याचा विचार करा. म्हणजे, सरताज मदनी त्या गोष्टीचं समर्थन करतात की काय?
हिंदुस्थान, पाकिस्तान आणि हुर्रियत अशी एकत्र बैठक घेतली तर मार्ग निघेल. यातला पूल होण्याची मेहबूबाची, आमची सगळ्यांची तयारी आहे. काश्मीर समस्येवर अटल बिहारी वाजपेयींनी काढलेला मार्ग चांगला होता. जमुरियत, काश्मिरीयत आणि इन्सानियत असं वाजपेयीजी म्हणाले होते. म्हणजे, लोकभावना, काश्मिरीपण आणि माणुसकी- हे जपायला हवं. पण तसं पुढं काहीच झालं नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून त्यावरूच चालायला हवं. गिलानीसाहेब त्यांना का नाही भेटले? चर्चेची जरा कुठं सुरुवात झाली म्हटलं की, हल्ले झाले, असंच आतापर्यंत असं झालंय. कश्मीर- कश्मिरीयत आणि कश्मिरी यांचं अस्तित्व टिकलं पाहिजे, डेव्हलपमेंट इज नॉट इश्यू, पैसा भी इश्यू नहीं है. पॉलिटिक्स का मसला है. विकास तर पाहिजेच, पण स्वाभिमान त्याहून जास्त पाहिजे. हुर्रियत वालोंसे बात नहीं करोगे, नाराज लोगोंसे बात नहीं करोगे तब कुछ नही होगा.
ते दगड उचलतात, बंदूक उचलतात, आता तोफाही घेतील. चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा? दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिंबा देतो, तर पैसा का नाही देणार? मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोलतात, पण काश्मीरचा विषय येत नाही. पंतप्रधानांनी मनात आणलं तर ते हुर्रियतशी बोलून प्रश्न सोडवू शकतात. कश्मीर हिंदुस्थान का दिल है; वो दिल दुखता है तो
हिंदुस्थानने कुछ करना चाहिये. प्रश्न तर खूप आहेत, कुठूनही सुरुवात करता येते. पाकिस्तान कश्मीर का दावेदार है मगर हम हिंदुस्थानी है. आम्हांला शांतता हवी आहे. सगळ्या धर्मांपेक्षा वरचा धर्म आहे माणुसकी! शेरबाग पहा. मध्ये मंदिर आहे, चारी बाजूला मशिदी आहेत. मंदिरातून पाणी वाहतं, ते सगळ्या मशिदींना पोहोचतं. असं काश्मीर आहे.
ङ्गद ग्रेटर कश्मीर हे तिथलं एक महत्त्वाचं वृत्तपत्र आहे. त्याचे संपादक आहेत फैय्याज अहमद कल्लू. ते एडिटर्स गिल्डचे चेअरमन आहेत.
ते इंग्लिशमधून निघतं. त्यांची इतर नियतकालिकं उर्दूमधून येतात. उर्दू ही काश्मीरची राज्यभाषा आहे. काश्मिरी ही बोली भाषा आहे; ती उर्दूपेक्षा वेगळी असली तरी लिहिली जाते उर्दू लिपीत. कल्लू यांच्याशी आम्ही चर्चा केली. दहशतवादी कारवायांमुळं वृत्तपत्र व्यवसायावरही दुष्परिणाम झालाय असं त्यांचं म्हणणं. काश्मीरची परिस्थिती बिघडली त्याला ते काँग्रेसला जबाबदार धरतात. काँग्रेसवाल्यांनी विश्वासघात केला असं त्यांचं म्हणणं आहे. ङ्गअगर उस वख्त फारूख अब्दुल्लाह को काम करने दिया होता तो तो ये दिन नहीं होते.फ समस्या नीट हाताळली नाही. अलीकडे तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वासच उडालाय. दिल्लीला कुटुंबप्रमुख बसतात. पंतप्रधानांनी सरकारचे प्रमुख म्हणून काश्मीर प्रश्नाकडे पहायला हवं. त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. सर्वांना बरोबर घेऊन जाणं हे मोठ्यांचं कर्तव्य आहे. समस्या राजकीय आहे. हिंदुस्थान विरुद्ध काश्मीर असं चित्र आजवर निर्माण केलं गेलंय ते वास्तविक चुकीचं आहे. पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर जे फटाके उडवतात ते पाकिस्तानचे समर्थक नाहीत, ती भारताविरुद्धची प्रतिक्रिया आहे. पूर्वी लष्कर दहशतवाद्यांना समजावून सांगत होते, आता मारून टाकतं, असं कल्लू म्हणतात. अटल बिहारी वाजपेयींनी चांगली पावलं उचलली होती. त्यांनी माणुसकीचं आवाहन केलं होतं. ते पूर्ण करण्याची विनंती काश्मीरी करत आहेत. काश्मिरी प्रेमळ आहेत, त्यांच्याशी संवाद साधा. आम्हांला पीस विथ डिग्निटी हवी आहे. इथले हस्तकारागीर स्वावलंबी होते. हॉर्टिकल्चरचा व्यवसायही चांगला चालतो. आमचे अनेक लहान-मोठे व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. हम हिंदुस्थानी है. हमारा प्रधानमंत्री नवाज शरीफ नहीं है.
आणि सगळेजण म्हणतात तसे कल्लूही शेवटी म्हणालेच, टीव्हीवाल्यांनी आमचं काहीच दाखवू नये. त्यांच्या चुकीच्या बातम्यांनी तबाही मचा रख्खी है. त्यांना सांगा, आम्हांला शांततेनं जगू दे. वाहिन्यांनी काश्मिरी उद्योजकांना बदनाम केलं. त्यांच्यावर कुणीच काही नियंत्रण का नाही ठेवलं?
कल्लू आणि त्यांच्यासोबत आलेले रशीद मखदूम, हॉटेल व्यावसायिक मुश्ताक अहमद यांचा लष्करावर रोष दिसला. सैनिकांच्या पॅलेट बंदुकांनी लोकांचे डोळे गेले. सैनिकांनी सरहद्दीवर काम करावं. त्यांचं काम तिथं आहे. आत पोलिस असतातच. काश्मीरमध्ये बाहेर सैनिक, आत सैनिक! सैनिक इथं ट्रॅफिक पोलिसांचंही काम करतात. हे कितपत बरोपर आहे? सैनिकांनी सामान्य नागरिकांना आपल्या पुढं उभं करून ते दहशतवाद्यांना सामोरे गेले. म्हणजे मेले तर नागरिक मरावेत. असं पूर्वी अनेकदा व्हायचं. अंतर्गत सुरक्षिततेचं काम पोलिसांनी करावं; पण पोलिसांमध्ये जर शत्रू पाहिला, तर त्याच्याविषयीचा आदर राहणारच नाही.
हिमालयात पूर्वी नागवंशीय लोक रहात होते. नंतर बाकीचे लोक समजायला लागले की, नाग रहात होते. नग म्हणजे पर्वत नगावर राहतात ते नाग.
श्रीनगरमध्ये दल सरोवराच्या काठाशीच शेर- ए- काश्मीर कन्व्हेन्शन सेंटर आहे. काश्मीरच्या सौंदर्यात भर घालणारे हे ठिकाण आहे.
तिथल्या स्वच्छतागृहातही गुलाबाच्या कुंड्या ठेवून ते सजवलेलं आहे. पर्यटन विभागाचे सचिव फारूख शाह यांनी पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांच्या संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह एक बैठक आयोजित केली होती. सुमारे पंचवीस व्यावसायिकांनी आपापली कैफियत मांडली.
काश्मीर खोर्यात इतर उद्योगांना काही वाव नाही. पर्यटन हाच एक प्रमुख व्यवसाय आहे. गांधीजींना काश्मीरमध्ये आशेचा किरण दिसला होता. काश्मिरींनी संकटग्रस्त यात्रिकांना आसरा दिला होता. गुलमर्गमध्ये मंदिराची देखभाल करतो तो मुस्लिम आहे. प्रत्यक्ष काश्मिरी जनतेच्या मनात हिंदु- मुसलमान असा भेद नाही. खरं तर काश्मीरला ब्रँड अँबेसिडर नेमावा अशी चर्चा होते. पण काश्मीर स्वतःच एक ब्रँड आहे, दुसरा नेमण्याची आवश्यकताच नाही. स्वित्झर्लंडपेक्षा काश्मीर सुंदर आणि स्वस्त आहे. पण केंद्र सरकारनं

No comments:
Post a Comment